R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एअर इंडियाला रूळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल- रतन टाटा

एअर इंडियाला रूळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल- रतन टाटा

 

काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेली एअर इंडिया कंपनी डबघाईला आली होती. त्यातच केंद्राने एअर इंडियाचे खाजगीकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले होते. त्यातच तब्बल १८००० कोटी मोजून टाटा सन्सने त्यांच्या एअर इंडियन्सवर पुन्हा ताबा मिळवला आहे. यानंतर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी एअर इंडियाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असल्याचं रतन टाटा यांनी म्हटलं आहे.

टाटा समूहने एअर इंडियाला खरेदी केल्यानंतर या करारा अंतर्गत टाटा समूह विमान कंपनीने १५३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडलं आहे. तसेच टाटा समूहाकडून सरकारला २७०० कोटी रोख मिळतील. टाटा सन्सने एअर इंडियावर ताबा मिळवला असून यावेळी त्यांनी जेआरडी टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ट्विट करून फोटो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

१९३२ साली एअर इंडियाची स्थापना जेआरडी टाटा यांनी केली होती. मात्र, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १९५३मध्ये एअर इंडिया भारत सरकारच्या ताब्यात गेली होती. त्यानंतर आता तब्बल ६८ वर्षानंतर एअर इंडियाने पुन्हा मालकी मिळवली आहे. एकेकाळी भारत सरकारची आर्थिक स्त्रोत असलेली एअर इंडिया ही सरकारी कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात होती. कंपनीच्या आणि केंद्राच्या आर्थिक संकटाला हातभार लागावा यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियाला विकण्याचा निर्णय घेतला होता.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments