R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या चिपी विमानतळा लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे आज एकाच मंचावर

चिपी विमानतळा लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे आज एकाच मंचावर

 

मुंबई | संपूर्ण कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या चिपी विमानतळाचे आज लोकार्पण होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाईवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय लघु व सुक्ष्म विकासमंत्री नारायण राणे तसेच स्थानी खासदार आणि आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. तसेच मागच्या काही दिवसांपासून त्यांनी जाहीर भाषणांतूनही एकमेकांवर जोरदार प्रहार केले आहेत. राज्यातील जनतेला हा सामना नवा नाही. दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर प्रथमच हे दोन्ही नेते एका मंचावर येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

साधारण २० वर्षांपूर्वी चिपी विमानतळाचे काम सुरु झाले. प्रदीर्घ काळानंतर आता कुठे या विमातळाच्या प्रत्यक्ष वापराचा मुहूर्त लाभत आहे. या विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरुनही काहीसे राजकीय वातावरण तापले होते. चिपी विमानतळ कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावण्याची आवश्यकता नाही, असे विधान नारायण राणे यांनी केले होते.

दरम्यान, नारायण राणे यांनी नंतर मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांनी पाहुणे म्हणून कार्यक्रमाला यावे अशी भूमिका प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली. दरम्यान, आजच्या कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे एकमेकांना भेटणार का? काही बोलणार का? त्यांच्या समर्थकांच्या भूमिका काय आणि कशा असतील? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments