R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति वसुली करताना ससा आणि मदत करताना कासव, फडणवीसांचा ठाकरे सरकारची घणाघाती टीका

वसुली करताना ससा आणि मदत करताना कासव, फडणवीसांचा ठाकरे सरकारची घणाघाती टीका

 

मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच मुद्दयावरून आता विरोधकांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये चाललेय तरी काय? विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना अद्यापही प्रत्यक्षात मदत मिळालेली नाही. वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत करायची वेळ येते तेव्हा सरकारचा ‘कासव’ होतो असा टोला विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाडा आणि विदर्भातील परिसराची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील शेतकरी संकटात आहे, मात्र राज्य सरकारकडून काहीही मदत जाहीर झालेली नाही. मार्च, एप्रिल, मे २०२१मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पाच महिन्यांनी शासनादेश निघाला.

तसेच जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर मदतीची प्रेसनोट तीन महिन्यांनी काढली. सहा-आठ महिने मदतीचे आदेशच निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहोचणार, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे. एकरी ५० हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments