R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात, लवकरच सत्ता बदलणार भाजपच्या माजी मंत्र्यांचे सूचक...

शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात, लवकरच सत्ता बदलणार भाजपच्या माजी मंत्र्यांचे सूचक विधान

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाकडून सतत सरकार पडण्याच्या तारखा जाहीर कारण्यात येत होत्या. त्यातच आता राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप असा वाद झालेला पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत घरोबा केला असला तरी आता या पक्षांमध्ये फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आलेला आहे.

शिवसेनेचे बारा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याला केल्यामुळे एकच राजकीय खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी हा दावा केला आहे. शुक्रवारी ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. शिवसेनेचे बारा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा बबनराव लोणीकर यांनी केला. त्यामुळे शिवसेनेला आगामी निवडणुकांच्या दरम्यान मोठा भगदाड पडणार का? शिवसेनेला धक्का बसणार का? हे पाहणे आता महत्वाचं आहे.

दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे कार्यकर्ता मेळावा घेत प्रवेश केला. चंद्रकांत पाटील यांनी साबणेंना भाजपमध्ये प्रवेश देऊन देगलूर विधानसभा निवडणूकीची उमेदवार म्हणून ही जाहीर करून पाटील यांनी निवडणूकीच्या कामाला लागा असे आदेश दिले होते.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments