R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या हिसाब तो जरूर होगा, चिपी विमानतळ उद्घाटनावर नितेश राणेंचं सूचक ट्वीट

हिसाब तो जरूर होगा, चिपी विमानतळ उद्घाटनावर नितेश राणेंचं सूचक ट्वीट

 

नारायण राणे केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्या शिवसेना विरोधाला अधिकच धार चढल्याचं दिसून येत आहे. आज सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, त्याआधीच चिपी विमानतळाचं श्रेय नेमकं कुणाचं? यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

विमानतळाबाबत शिवसेनेकडून कोकणात मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी सुरू असून दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील विमानतळाचं श्रेय आमचंच, असं पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून या मुद्द्यावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राणे आणि शिवसेना वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचं निमंत्रण विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच न पाठवल्याचा राग भाजपाकडून व्यक्त केला जात आहे. त्यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. “ही तीच शिवसेना आहे, जी चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागली होती. आणि आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्याचं देखील सौजन्य दाखवलं नाही”, असं नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments