R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पर्यटन मंत्री म्हणून आश्वासन देतो की, कोकणच्या विकासासाठी अग्रेसर असू - आदित्य...

पर्यटन मंत्री म्हणून आश्वासन देतो की, कोकणच्या विकासासाठी अग्रेसर असू – आदित्य ठाकरे

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, कोकण जगातील पर्यटकांचे आकर्षक केंद्र आहेच. मात्र, जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात कसे येतील, यावर भर देणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली.

ते म्हणाले की, संपूर्ण कोकणवासीयांकडे खरोखरच आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. पर्यटन मंत्री म्हणून आश्वासन देतो की, कोकणच्या विकासासाठी अग्रेसर असू. या ठिकाणी येताना विमान लँड करत असताना कोकणाचे अद्भूत सौंदर्य पाहिले. निळे पाणी, लाल माती, मनमोहक समुद्र किनारा पाहिला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाचाच जिल्हा आहे. या जिल्ह्यात पर्यटनाची मोठी क्षमता आहे. त्यादृष्टीनेच पुढील काळात काम आणि योजना आखणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील कोकण हे संपूर्ण जगभरात पर्यटनाचे एक प्रमुख आकर्षण केंद्र असून, यापुढे जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात कसे येतील, यावर भर देणार आहे. तसेच प्रत्येक आठवड्यात कोकणासाठी काय करू शकतो, याकडे लक्ष देणार आहे. राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत कोकणच्या विकासासाठी नवीन योजना आणण्यावर काम करणार आहोत असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments