R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "अजित पवार यांच्या नातलगांच्या कारवाईमागे फडणवीसांचा हात"

“अजित पवार यांच्या नातलगांच्या कारवाईमागे फडणवीसांचा हात”

 

मावळ | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर आणि नातलगांवर आयकर विभागाची धाडसत्र सुरु झाले आहे. याच विरोधात आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील विरोधकांवर तोफ डागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी थेट राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फणवीसांनी आरोप केले आहे.

सकाळी सहा वाजल्यापासून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करीत असताना काही भाजप नेते जाणीपूर्वक त्यांना बदनाम करण्याचा डाव आखत आहेत. एक सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्रातील जनता अजित पवार यांच्याकडे पाहत असल्याने भाजप नेत्यांचा पोटशूळ उठत आहे. दादांच्या नातलगांवरील केंद्रीय आयकर विभागाच्या कारवाईमागील पडद्यामागचे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला.

आमदार शेळके म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती खंबीरपणे हाताळली. करोना कालावधीत दररोज सकाळी सहा वाजता मंत्रालयात जाऊन राज्यातील परिस्थितीवर देखरेख ठेवणे, अडचणीतील नागरिकांना मदत केली. या कठीण काळात राज्याची आर्थिक घडी सावरली. त्यातून आरोग्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. मंत्रालयात सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत आलेल्या नागरिकांचे अजित प्रश्‍न सोडवितात, हे अख्खा महाराष्ट्र जाणतो.

काम होणार असेल तर ते हाता वेगळे करतात आणि होणार नसेल तर तोंडावर होणार नाही, असे सांगतात. राज्यातील तरुणांमध्ये अजितदादांची मोठी ‘क्रेझ’ असून, दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ होत आहे. एक सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्रातील जनता अजित पवार यांच्याकडे पाहत आहेत. त्यामुळे भाजपचा पोटशूळ उठला आहे. त्यातूनच केंद्रीय संस्थाचा गैरवापर करून त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास दिला जात आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments