R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्याच्या नव्या अधिसूचनेमुळे विकासकामांना दिलासा मिळेल

ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्याच्या नव्या अधिसूचनेमुळे विकासकामांना दिलासा मिळेल

लवकरच जाहीर होणाऱ्या नव्या अधिसूचनेमुळे, ठाणे येथील फ्लेमिंगो अभयारण्याच्या इको सेन्सेटिव्ह झोनच्या बाहेरील विकासकामे रखडणार नाहीत, असे सूतोवाच करत नवी अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री श्री भुपेंद्र यादव यांनी दिली आहे. दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी या विषयासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या भेटी दरम्यान नव्या अधिसूचनेविषयी मंत्री महोदयांनी प्रतिक्रिया दिली. या नव्या अधिसूचनेमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील रखडलेल्या विकासकामांना दिलासा मिळेल.

ठाणे खाडीच्या किनाऱ्यावरील भूखंड फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून आरक्षित आहे. देशभरातील अभयारण्ये आणि वन्यजीव संरक्षित क्षेत्रांच्या भोवतीच्या इको सेन्सेटिव्ह झोनबाबत केंद्रीय पर्यावरण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमुळे ठाणे येथील फ्लेमिंगो अभयारण्याच्या बाहेरील बांधकामांपुढेही मोठी समस्या निर्माण झाली होती.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरातील नव्या-जुन्या विकासकामांना खीळ बसण्याची शंका व्यक्त केली जात होती. या अधिसूचनेबाबत राज्य सरकारने सुधारित आराखडा केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठविला होता. या आराखड्यातील सूचनांनुसार योग्य ते बदल करून नवी अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

  मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक स्वरूपाचे गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मंत्री नवाब...

कामगारांच्या समस्या मांडून मनसे कामगार सेना कंपनीतून बाहेर पडताच शिवसेनेच्या कामगार संघटनेची कर्मचाऱ्यांना अरेरावी

  मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहेत. त्यात येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments