R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सामनाचं नाव बदलून आता 'बाबरनामा' ठेवा, पडळकरांचा टोला

सामनाचं नाव बदलून आता ‘बाबरनामा’ ठेवा, पडळकरांचा टोला

सांगली | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून लखीमपूर घटनेवर भाष्य करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या हिमतीची दाद देत त्यांचं कौतुकच केलं ओट. एवढच नव्हे तर त्यांनी प्रियांका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी केली. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत म्हंटल की, जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रूपांतर ‘बाबरनामा’त केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय,’ असं पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी सर्कावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे.

काय लिहिलं आहे सामनात

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतला संवाद त्यांनी आजच्या सामनाच्या रोखठोक सदरात लिहिला आहे. ‘यह लोक लोकतंत्र को पुरी तरह से खतम करने जा रहे है। लेकीन हम लढेंगे!’ हे त्यांचं पुढचे वक्तव्य अधिक महत्त्वाचं. प्रियंका गांधी तुरुंगात होत्या आणि उत्तर प्रदेश सरकारने राहुल यांच्या या बहिणीस 36 तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवलं. ‘आप चिंता मत करिये,’ असं मी म्हणताच, ‘हम जेल की चिंता नही करेंगे। प्रियंका में हिम्मत है। मी उद्याच लखनौला निघतोय. मला अटक झाली तरी हरकत नाही,’ असं राहुल गांधी म्हणाल्याचं अग्रलेखात राऊतांनी सांगितलंय.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments