R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "नवाब मलिकांची आदळआपट का सुरु? कारण तो खान आहे,

“नवाब मलिकांची आदळआपट का सुरु? कारण तो खान आहे,

 

मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक आणि त्यावरुन सुरु झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असताना याला आता या सगळ्या प्रकरणाला धार्मिक वळण मिळताना दिसून येत आहे. कारण या प्रकरणात एक खान अडकल्यामुळं नवाब मलिकांची आरडाओरड सुरु आहे, असा आरोप भाजप नेत्यांनी सुरु केला आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी सुशांत सिंह राजपूत आणि आर्यन खानच्या धर्माचा उल्लेख करत नवाब मलिकांना काही सवाल विचारले आहेत.

भाजप नेते नितेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, “नवाब मलिकांची आदळआपट का सुरु? कारण तो खान आहे, सुशांतसिंह राजपूत नाही. खान आडनाव असल्यामुळे तो पीडित ठरतो का? सुशांतसिंह राजपूत हिंदू होता, म्हणून तो व्यसनाधीन होतो का?” , असे प्रश्न नितेश राणे यांनी ट्वीट करत उपस्थित केले आहेत. आता या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आर्यन खानसोबत काही हिंदू तरुण-तरुणींनाही अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी ट्वीट करत उपस्थित केलेले प्रश्न कितपत योग्य आहेत? असं विचारलं असता ते म्हणाले की, “माझं एवढंच म्हणणं आहे की, जी तळमळ नवाब मलिक या संपूर्ण प्रकरणातून दाखवत आहेत.

 

तसेच हाच न्याय त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला का दिला नाही? म्हणजे, सर्व धर्मांना एकसमान न्याय, असा दृष्टीकोन का ठेवला जात नाही? इथे ते ज्याप्रकारे दररोज आदळआपट करतायत. तसेच इथे एकंदरीत जे चाललंय त्याबाबत जे मत प्रदर्शन करतायत. त्यावरुन सरळ स्पष्ट होतंय की, हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचं ते काम करतायत असं आरोप राणे यांनी मलिक यांच्यावर लगावला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments