R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपच्या घोटाळेबाज नेत्यावर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र...

भाजपच्या घोटाळेबाज नेत्यावर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र झाले का?

कोल्हापूर| राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापत असून राज्यातील अनेक आजी-माजी खासदार आणि मंत्र्यांवर ईडी आणि आयकर विभागाच्या धाडी पडताना दिसून आल्या होत्या. त्यातच दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकाच्या घरी सुद्धा आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. या धाडसत्रानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून याच पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजु शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

गेल्या पाच वर्षात आयकर आणि इतर केंद्रीय यंत्रणांनी धाडी टाकल्या, त्याचे पुढे काय झाले? त्यात काय सापडले याची माहिती जनतेला मिळायला हवी. केंद्र सरकार सीबीआय, ईडी सारख्या घटनात्मक संस्थांचा वापर राजकीय बदला घेण्यासाठी करत असून या वापरामुळे या संस्थांबद्दलचा आदर कमी झाला आहे. भाजपच्या घोटाळेबाज नेत्यावर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र झाले का?, असा प्रश्न देखील राजु शेट्टी यांनी भाजपला केला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कुणीच वाली राहिलेला नाही आहे. केंद्र आणि राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. राज्य सरकार मदत करत नाही त्याचबरोबर केंद्राचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त गोड बोलतात, तोंडी आधार देतात, जे द्यायचे ते थेट द्या, असंही राजु शेट्टी म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments