R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश कृषी कायदे पास होत असताना मविआ खासदार शेपूट घालून का बसले होते...

कृषी कायदे पास होत असताना मविआ खासदार शेपूट घालून का बसले होते : संदीप देशपांडे

 

मुंबई | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडल्यामुळे त्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा महाराष्ट्र बंद आहे असे सांगण्यात येत आहे. मात्र आता या आंदोलनावर मनसेने आक्षेप घेतला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. संसदेत शेतकरी कायदा बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद का होती ? पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय? असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले आहेत.

संदीप देशपांडे म्हणाले, “आज लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. सणासुदीच्या दिवसात थोडा-बहुत व्यापार होतो. अशा दिवसांत तुम्ही बंद करता आहात? हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद आहे. पोलोस लोकांची दुकाने बंद करीत आहेत. ही कुठली पद्धत? मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला का ?”

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘एक प्रभाग एक उमेदवार’ निवडणूक पद्धतीला रिपाई’चा विरोध

  मुंबई | एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकारने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लागू...

दिवाळीत पुणेकरांना मिळणार म्हाडाचं मोठं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

  पुणे | यंदा पुणेकरांना म्हाडाकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. येन दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष भेट मिळणार आहे. पुणे म्हाडाकडून दिवाळीत ३ हजाराहून...

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग, मलिक म्हणतात व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शारुख खान याचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबी अधिकारी समीर वानखडे याने काल आर्थरोड जाईलमध्ये जाऊन काऊन्सिलिंग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments