R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मावळमधील शेतकऱ्यांवर गोळीबार विसरले का? नितेश राणेंचा सरकारला सवाल

मावळमधील शेतकऱ्यांवर गोळीबार विसरले का? नितेश राणेंचा सरकारला सवाल

 

मुंबई | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडल्यामुळे त्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा महाराष्ट्र बंद आहे असे सांगण्यात येत आहे. मात्र आता या आंदोलनावर भाजपने टीकास्त्र सोडले आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे राज्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल बोलत असताना नितेश राणे यांनी आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या मावळमधील गोळीबाराची घटनेचा उल्लेख करत टीका केली आहे. ‘महाविकास आघाडी सरकारमधले काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असताना मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार विसरले आहेत का? असा सवालच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना विचारला आहे.

मुळात आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दुसऱ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बंद करणे कितपत योग्य आहे? काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना शेतकरी आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आहे का ? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments