R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश शिवसेनेचा दसरा मेळावा या ठिकाणी होणार संपन्न, संजय राऊत यांची माहिती

शिवसेनेचा दसरा मेळावा या ठिकाणी होणार संपन्न, संजय राऊत यांची माहिती

 

मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील जवळच्या सभागृहात पार पडला होता. मात्र काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यंदाचा दसरा मेळावा कोरोनाचे संसर्गाचे नियम पळून पार पडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे यावेळी सुद्धा शिवसेनेचा मेळावा सभागृहात पार पडणार की शिवतीर्थावर अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येत होती.

मात्र आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा निश्चित झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. गेल्या वर्षीदेखील शिवसेनेचा दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात संपन्न झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सभागृहात पार पडणार आहे.

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दिली. या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती असेल. शिवसेनेचे मंत्री, वरिष्ठ नेते, उपनेते, आमदार, महापौर, काही नगरसेवक या सोहळ्याला हजर राहणार असतील. गेल्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर सभागृहात संपन्न झाला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

  मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक स्वरूपाचे गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मंत्री नवाब...

कामगारांच्या समस्या मांडून मनसे कामगार सेना कंपनीतून बाहेर पडताच शिवसेनेच्या कामगार संघटनेची कर्मचाऱ्यांना अरेरावी

  मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहेत. त्यात येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र...

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments