R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया काय सांगता | ५ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीने लस घेतल्याचा आला मॅसेज...

काय सांगता | ५ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीने लस घेतल्याचा आला मॅसेज !

 

संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संसर्गाला रोखनसाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी रुग्णालयात आता केंद्र सरकारने लसीचे डोस उपलब्द करून देण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी या लसीकरण मोहिमेत फज्जा उडताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कलकत्त्यात तीन महिन्यापूर्वी मृत झालेल्या महिलेचे लसीकरण झाल्याचा मॅसेज आल्याने केलेच खळबळ उडाली होती. आता अशीच घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर ५ महिन्यांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

मृत व्यक्ती कोरोना लसीचा दुसरा डोस कसा घेऊ शकते हाच प्रश्न उपस्थित करत मृत व्यक्तीच्या मुलाने या प्रकरणी थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना ट्विट करून याबाबत सवाल विचारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघव नगर परिसरातील श्रीप्रकाश तिवारी हे एक सेवानिवृत्त अधिकारी होते. एप्रिलमध्ये त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर श्रीप्रकाश तिवारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

श्रीप्रकाश तिवारी यांच्या मृत्यूच्या पाच महिन्यानंतर मोबाईल नंबरवर एक मेसेज आला. त्यांच्या मुलाने मेसेज पाहिला असता त्यामध्ये तिवारी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचं म्हटलं आहे. यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. मृत व्यक्तीला दुसरा डोस कसा दिला गेला असाच सवाल सर्वजण आता उपस्थित करत आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाची आणि भोंगळ कारभाराची चर्चा सुरू आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments