R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति सेनेच्या उपमहापौरांच्या पतीची निष्पाप रिक्षाचालकांना काठीने मारहाण

सेनेच्या उपमहापौरांच्या पतीची निष्पाप रिक्षाचालकांना काठीने मारहाण

 

ठाणे | लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांसह इतर सर्वच मित्रपक्षांनी पाठींबा दिला आहे. मात्र भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केल्याचं दिसून येतंय. तर बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे ठाण्यात शिवसनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा गुंडागर्दी दिसून आली आहे.

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या ठाण्यात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयत्न केला. ठाण्याचे शिवसेनेचे उपमहापौर यांचे पती मारहाणीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर बाजारपेठेत एकत्र फिरून दुकाने बंद केली. एकीकडे टीएमटी सेवा बंद असताना रिक्षाचालक प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवत होते.

मात्र रिक्षाचालक बंद करत नसल्याचं पाहत स्टेशन परिसरात शिवसेनेचे उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम हे आपल्या कार्यकर्त्यांसह स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेचे पुन्हा दादागिरी वाढली का अशी चर्चा रंगू लागली आहे. तसेच या मुद्द्यावरून विरोधक काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments