R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश "नैतिकता शिल्लक असेल तर बंद संपण्यापूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करा"

“नैतिकता शिल्लक असेल तर बंद संपण्यापूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करा”

 

मुंबई | लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेससह इतर सर्वच मित्रपक्षांनी पाठींबा दिला आहे. मात्र भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केल्याचं दिसून येतं आहे. मनसेच्या काही नेत्यांनी या बंद संदर्भात सरकारवर टिका केली होती. आता या महाराष्ट्र बंदवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करतानाच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील किंवा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहे. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन २५ हजाराच्या घोषणा केल्या, ५० हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. केली तरी तोकडी केली. त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचं सरकार बरं होतं. हे सरकार मदत करत नाही त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, अस फडणवीस म्हणाले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

  मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक स्वरूपाचे गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मंत्री नवाब...

कामगारांच्या समस्या मांडून मनसे कामगार सेना कंपनीतून बाहेर पडताच शिवसेनेच्या कामगार संघटनेची कर्मचाऱ्यांना अरेरावी

  मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहेत. त्यात येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments