R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "श्रीरामाचा खोटा जप करणाऱ्या भाजपकडून देशात रावणाचे कृत्य"

“श्रीरामाचा खोटा जप करणाऱ्या भाजपकडून देशात रावणाचे कृत्य”

 

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेससह इतर सर्वच मित्रपक्षांनी पाठींबा दिला आहे. मात्र भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केल्याचं दिसून येतं आहे. तर दुसरीकडे या बंदचे पुण्यात पडसाद दिसून आले होते. यावेळी काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती.

‘एका बाजूने महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन चांगले काम करत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांवर जीवघेण्यापर्यंतचे अत्याचार सुरु आहेत. आता नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. दसऱ्याला रावण दहन केले जाते. श्रीरामाचा खोटा जप करणाऱ्या भाजपकडून देशात रावणाचे कृत्य सुरु आहे. सर्व शेतकरी संघटना, आघाडीचे तिन्ही पक्ष, सर्वसामान्य जनता, एकत्र येऊन लखीमपूर घटनेचा निषेध करत भाजप रावणाचे दहन करणार आहोत. असा हल्लाबोल कदम यांनी केंद्रावर केला आहे.

पुढे कदम म्हणाले की, ‘शेतकरी कायद्याच्या विरोधात अन्नदाता दीड, दोन वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान केंद्रातील मंत्री त्यांच्याकडे डुंकूनही बघत नाहीत. त्यानंतर लखीमपूर घटनेत आपले शेतकरी भावंडं आंदोलन करताना त्यांना चिरडून टाकण्याचं काम भाजप मंत्र्याने केले आहे. आपल्या देशातील ही घटना अतिशय निंदनीय असल्याचे ते म्हणाले आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments