R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकरांनी लगावला पवारांना टोला

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकरांनी लगावला पवारांना टोला

 

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केल्याचं दिसून येतं आहे. तर दुसरीकडे या बंदचे राज्यभरात पडसाद दिसून आले आहेत याच मुद्द्यावरून भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे. तसेच पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचले आहे.

पडळकर यांनी म्हटलं आहे की, लखीमपुरच्या घटनेबद्दल आम्हाला संपुर्ण सहानुभूती आणि सहवेदना आहे. म्हणून याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु आहे. आमचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे क्षमतापुर्ण नेते आहेत. ते निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करतील परंतु जनाब संजय राऊत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्याबाबत बोला जो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत असा घणाघात पडळकरांनी केला आहे.

शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या खाबूगिरीत अडकवून ठेवलं आहे. आजचा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे स्वतःच्या घरी आग लागले असताना शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखे असल्याची खोचक टोला त्यांनी लगावला आहे. तुमचे खरं दुःख हे काकाजींच्यासाठी सतावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली किड साफ करायचे ठरवले आहे. ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले कारखाने कवडीमोल दराने गिळंकृत केले अशा सर्वांचे फास आवळत आहेत. यामुळे पित्त खवळले असून महाराष्ट्र बंदचा देखावा केला असल्याचे पडळकर यांनी म्हटलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments