R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ६ वेळा आमदार आणि परिवहन मंत्री यशपाल आर्य मुलासह काँग्रेसमध्ये सामील

६ वेळा आमदार आणि परिवहन मंत्री यशपाल आर्य मुलासह काँग्रेसमध्ये सामील

 

उत्तराखंड | उत्तराखंडच्या विधसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना भाजपला मोठा झटका बसला आहे. आमदार यशपाल आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दरम्यान, परिवहन मंत्री यशपाल आर्य आणि त्यांचा मुलगा नैनीतालचे आमदार संजीव आर्य यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

यशपाल उत्तराखंड सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री आणि परिवहन मंत्री होते. या दरम्यान, दोन्ही नेते माजी मुख्यमंत्री हरीश रावत, राज्य प्रभारी देवेंद्र यादव, काँग्रेस प्रदेश समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोडियाल, राष्ट्रीय सरचिटणीस-संघटना केसी वेणुगोपाल, राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात सामील झाले.

यशपाल आर्य सध्या उत्तराखंड सरकारमध्ये मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे परिवहन, समाज कल्याण, अल्पसंख्यांक कल्याण, विद्यार्थी कल्याण, निवडणूक आणि उत्पादन शुल्क विभाग असे ६ विभाग आहेत. तर संजीव आर्य त्याचा मुलगा आहे. यशपाल आर्य हे बाजपूरचे आमदार आहेत आणि त्यांचा मुलगा संजीव आर्या नैनीताल मतदारसंघातून आमदार आहेत.

२०१७ मध्ये दोघांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने या दोघांनाही विधानसभा निवडणुकीत उमेदवार बनवले होते. वडील आणि मुलगा दोघेही भाजप पक्षातून विजयी झाले. यानंतर भाजप सरकारने यशपाल आर्य यांना कॅबिनेट मंत्री केले. मात्र, विधानसभा निवडणुका -२०२२ च्या आधीच यशपाल आणि संजीव पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments