R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अभिनेता सनी देओलच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज

अभिनेता सनी देओलच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज

 

मुंबई | अभिनेता सनी देओल लवकरच त्याचा बिग बजेट असलेल्या ‘चुप ः रिव्हेंज ऑफ द आर्स्टिस्ट’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात सनी देओलसह पूजा भट्ट आणि दुलकर सलमान मुख्य भूमिका साकारणार आहेत. सनी देओलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटरवर या चित्रपटाचा टीझर चाहत्यांशी शेअर केला आहे.

सनी देओलच्या या टीझरवरून हा चित्रपट निर्माता गृरू दत्त यांच्याशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. या टीझरमध्ये त्यांचा फोटो आणि त्यांच्या ‘प्यासा’ चित्रपटातील ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्‍या है’ हे गाणे बॅकग्राउंडमध्ये ऐकू येते. बॉलीवूडमधील अनेक सेलेब्सनेदेखील या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनीही एक पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘चुप… मोशन पोस्टर.’ याशिवाय अक्षय कुमारनेही हा टीझर शेअर करत लिहिले की,

‘हे पाहिल्यानंतर आपण चुप राहू शकणार नाही. मलाही अनेक प्रश्‍न पडले आहेत. काय शानदार पोस्टर आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments