R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या रिक्षा चालकांना मारहाण झालीच नाही; व्यापारी स्वच्छेने बंदमध्ये सहभागी

रिक्षा चालकांना मारहाण झालीच नाही; व्यापारी स्वच्छेने बंदमध्ये सहभागी

 

ठाणे | लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांसह इतर सर्वच मित्रपक्षांनी पाठींबा दिला आहे. मात्र भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केल्याचं दिसून येतंय. तर बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे ठाण्यात शिवसनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा गुंडागर्दी दिसून आली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या ठाण्यात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकारानंतर विरोधकांनी शिवसेना पक्षावर एकाच टीकेची झोड उठवली होती. यावर आता शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ठाण्यातील व्यापारी हे स्वच्छेने बंदमध्ये सहभागी झाले असल्याचं सांगत कोणत्याही रिक्षा चालकांना मारहाण झाली नसल्याचा दावा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

ठाण्यात सोमवारी महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता. परंतु यावेळी स्टेशन परिसर, जांभळी नाका, नौपाडा भागातील व्यापा:यांची दुकाने बंद करण्याचे काम आंदोलनकत्र्या शिवसैनिकांकडून केले जात असल्याचे चित्र दिसून आले. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा चालकांना देखील मारहाण करीत रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले. या बाबत एकनाथ शिंदे यांना छेडले असता, त्यांनी लखीमुपर झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्युनंतर हा बंद पुकारण्यात आला आहे. त्याला व्यापाऱ्यांनी आणि नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. ते स्वच्छेने या आंदोलनात सहभागी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments