R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रिक्षाचालक सरसावले, मात्र शिवसैनिकांनी खोडा घातला

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रिक्षाचालक सरसावले, मात्र शिवसैनिकांनी खोडा घातला

 

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांसह इतर सर्वच मित्रपक्षांनी पाठींबा दिला आहे. मात्र भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केल्याचं दिसून येतंय. तर बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे ठाण्यात शिवसनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा गुंडागर्दी दिसून आली.

कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना दुपारपर्यंत फारशी सक्रिय पाहायला मिळाली नाही. मात्र कल्याणात शिवसैनिक रसत्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आवाहन करूनही रिक्षा बंद न केल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते.एकंदरीत कल्याण डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून आजच्या बंदमध्ये आपण संपूर्ण ताकदीनिशी उतरणार अस स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही आज सकाळी शहरातील रिक्षा सुरूच असल्याचे दिसताच शिवसैनिक संतप्त झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर उतरत शिवसेनेत पक्षाकडून निदर्शन करण्यात आली. शिवसैनिकांकडून रिक्षाचालकांना अर्वाच्य भाषेचा प्रयोग करत रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांची समजूत काढत बाजूला केले. मात्र, कल्याण डोंबिवलीत कोरोनां काळात निर्माण झालेले आर्थिक संकट आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळपासूनच रिक्षाचालक नेहमीप्रमाणे बाहेर पडले होते.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments