R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home मनोरंजन "बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते"

“बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते”

 

‘बिग बॉस’मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय असा निर्णय घेणार नाही. बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच कीर्तनकार शिवलिला पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना भाष्य केले.

मी ‘बिग बॉस सिझन 3’ मध्ये जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाने वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ मंडळी नाराज झाल्याने मी त्यांना दोन हस्तक आणि एक मस्तक टेकवून माफी मागते. माझे विचार पोहचवण्यासाठी मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी माझा हेतू मात्र प्रामाणिक होता अशी भूमिका कीर्तनकार शिवलिला पाटील यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केली.

लहान वयात राज्यभर महिला कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीस आलेल्या शिवलीला पाटील या बिग बॉसमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत होती . सोशल मीडियात नेटकऱ्यानी त्यांना चांगलेच ट्रोल केल्याने शिवलीला काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते . विठ्ठल दर्शनाला आल्यानंतर त्यांनी मीडिया सोबत बोलताना आपले मन मोकळे केले .

बिग बॉस हा शो वारकरी संप्रदाय पाहत नाही हे मलाही माहित आहे. मात्र ज्या प्रेक्षकांना वारकरी परंपरा माहित नव्हत्या त्यांना त्या माहिती करून दिल्या. मी तिथे गेल्यानंतर तुळशी वृंदावनाच्या रोज सर्व मंडळी पाय पडू लागले तेथे ‘बोला पुंडलिक वरदाचा नाद घुमू लागला’ हेच माझे यश असल्याचे सांगताना तेथील विकृतीची प्रकृती बदलून दाखविल्याचे शिवलीला सांगते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

” भाजप नेत्याकडून महात्मा गांधी आणि राखी सावंतची तुलना”

  नवी दिल्ली | महात्मा गांधी कमी कपडे घालायचे परंतु कमी कपडे घातल्याने कोणी महान होत असेल तर राखी सावंत महान झाली असती असे वादग्रस्त...

जेठालालने घटवले तब्बल १० किलो वजन, हे आहे त्यामागचे गुपित |

  लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, बबिता, भिडे अशा सर्वच...

साहिल खानचं करिअर संपण्यामागे सलमान खानचा मोठा हात !

  अभिनेता साहिल खानवर मुंबईतील मॉडेल आणि बॉडीबिल्डर मनोज पाटील याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल सतत मनोजला करियर संपवेल अशी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments