R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ज्यांचा बंदला विरोध त्यांना शेतकरी विरोधी कायदे मान्य, शंभूराज देसाई यांचा मनसेला...

ज्यांचा बंदला विरोध त्यांना शेतकरी विरोधी कायदे मान्य, शंभूराज देसाई यांचा मनसेला टोला

 

सातारा | महाराष्ट्र बंद हा लखीमपूर येथे शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडले गेलेले त्याच्यासाठी आणि केंद्राने शेतकरी विरोधी केलेले कायदे याच्या विरोधात आहे. आता ज्यांचा या बंदला विरोध आहे, त्यांचा शेतकरी विरोधी कायद्यांना मान्यता आहेत असेच म्हणावे लागेल असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाव न घेता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई यांनी सोमवारी कराड शहरातील बंदोबस्ताची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मनसेने या बंदला विरोध केला असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. मंत्री देसाई म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे केले आहेत, त्याविरोधात उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. ते आंदोलन सुरु असताना केंद्र सरकारमध्ये एका राज्यमंत्र्यांच्या मुलाकडून नऊ शेतकऱ्यांना गाडी अंगावर घालून चिरडण्यात आले. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.

विरोधी पक्षनेते फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बंदला प्रतिसाद मिळालेला नाही, बंद फसला आहे, या वक्तव्यावर मंत्री देसाई म्हणाले, विरोधक जर सातारा जिल्ह्यात आले, तर त्यांना बंदला प्रतिसाद आहे की नाही हे कळेल. सकाळपासून दुपारपर्यंत लोकांनी 100 टक्के बंद पाळला आहे. विरोधकांना केवळ महाविकास आघाडीवर टीका करणे, महाविकास आघाडीने एखादा विषय हातात घेतला की तो कशा पध्दतीने हाणून पाडता येईल एवढेच पाहतात. विरोधकांचा त्याला विरोध असेल, तर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जो महाराष्ट्रातील जनतेने बंदला पाठिंबा दिला आहे, तो त्यांना मान्य नाही, असाच त्याचा अर्थ काढावा लागेल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

Recent Comments