R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी मुंबई भाजपच्या “मराठी कट्टा” ची सुरुवात

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी मुंबई भाजपच्या “मराठी कट्टा” ची सुरुवात

 

मराठी संस्कृती रुजविण्याचा तसेच मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न स्वातंत्रवीर सावरकर यांनी केला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. मुंबईतील मराठी माणसांना भेडसावणाऱ्या समस्या मांडण्याकरीता तसेच विचाराची देवाण घेवाण व्हावी याकरिता मुंबई भाजपने ‘मराठी कट्टा’ ह्या व्यासपीठाची सुरुवात केली.

मुंबई भाजप “मराठी कट्टा” या व्यासपीठा तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना देवेंद्रजी म्हणाले की, मराठी माणसांना भेडसावणाऱ्या समस्याचे निवारण करणाऱ्या अभिनव अश्या “मराठी कट्ट्याची सुरुवात आज होत आहे. मुंबईत जिकडे मराठी मन आहे तिकडे हा कट्टा आयोजित करण्यात येणार असून थोर विचारवंतांचे विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहचवण्याचे हे उत्तम व्यासपीठ असल्याचे देवेंद्रजी यांनी सांगितले.

पुढे बोलताना देवेंद्रजी म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्य मिळावे याकरिता ज्या यातना भोगल्या आहेत त्या “माझी जन्मठेप” या पुस्तकातून आपण जेव्हा वाचतो तेव्हा अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. एका व्यक्ती मध्ये इतकं तेज कसं असू शकतं यावर विश्वास बसत नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले, हरप्रकारे छळले. खडय़ा बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला जुंपले, नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वातंत्र्या पूर्वी आणि नंतर ज्या यातना भोगाव्या लागल्या त्या दुर्देवी होत्या अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर, मुंबई महामंत्री अमित साटम, आमदार आशिष शेलार, आमदार राहुल नार्वेकर, आमदार नितेश राणे, आमदार सुनिल राणे त्याचबरोबर भाजपा नेते, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई भाजप मराठी कट्टा या कार्यक्रमाचे सुत्र संचालन माधव बर्वे यांनी केले तसेच सतीश भिडे, उत्तम काळे, शैला सामंत, वसंत बर्वे , नितीन कार्यकार या गिरगावातील प्रसिद्ध प्रमुख व्यक्तींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल आपले विचार मांडले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

  दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक...

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

  नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments