R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'कोरोनाची नाही राज्यात महिला अत्याचाराची लाट' चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारवर ...

‘कोरोनाची नाही राज्यात महिला अत्याचाराची लाट’ चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारवर टीका

 

मुंबई | लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या मुद्यावरुन भाजपच्या अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली असताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येई की नाही माहित नाही, पण राज्यात महिला अत्याचाराची लाट येत असल्याचे म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, महाविकास आघाडीचं हे सरकार लोकधार्जिणे नसून, त्यांच्या आमदार, खासदार आणि बगल बच्च्यांसाठी हे सरकार आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही, हे माहिती नाही, पण राज्यात महिला आत्याचाराची लाट येत आहे. अत्याचाऱ्यांना पोलीस आणि सरकारची भीती राहिलेली नाही.

राज्यात कोणालाच धाक नाही. संजय राठोड सारख्या बलात्काऱ्याला आणि सरकारमधील भ्रष्टाचारी सहकाऱ्यांना वाचवण्याचं पाप हे सरकार करत आहे, असा घणाघात टीका त्यांनी केली आहे. तसेच ज्या मावळात आपण बसलोय त्याच मावळमधील शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यावेळी तीन शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार केले. त्यावेळेस महाराष्ट्र बंद का नाही केला? असा सवाल करत आमच्या संवेदना त्या उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments