R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ईडीने जप्त केलेल्या डीएसकेंचा बंगला चोरट्यांनी फोडला

ईडीने जप्त केलेल्या डीएसकेंचा बंगला चोरट्यांनी फोडला

 

 

पुणे | ठेवीदारांचा फसवणूक प्रकरणात कारागृहात असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी.एस.के यांच्या बंद बंगल्यात चोरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. चोरट्यांनी त्यांचा बंगला फोडून ७ लाखाची चोरी केल्याचे वृत्त समोर आले आहे. ईडीने कारवाई करत हा बंगला जप्त केलेला आहे. सेनापती बापट रस्त्यावरील बंगल्यात ही चोरी झाली आहे.याप्रकरणी भाग्यश्री कुळकर्णी यांनी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या डीएसके यांच्या नातेवाईक आहेत. डीएसके कुटुंबावर ठेवीदारांची फसवणूक यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली. सध्या डीएसके कारागृहात आहेत. दरम्यान ईडीकडून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यात सेनापती बापट रस्त्यावरील सप्तशृंगी बंगला देखील जप्त केलेला आहे. त्यामुळे तो कुलूप लावून बंद आहे.

यादरम्यान, चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तर घरातील ८ एलईडी टीव्ही, लॅपटॉप, सीसी प्लेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि देव घरातील चांदी,गिझर असा ६ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तक्रारदार यांना संशय आल्याने त्यांनी ईडीचे अधिकारी, पोलीस व पंच यांना बोलवून घेत पाहणी केली असता चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments