R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश भगवान गडावर दसरा मेळाव्याची तयारी, पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष

भगवान गडावर दसरा मेळाव्याची तयारी, पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष

 

बीड | कोरोना संसर्गाचे संकट कमी होत असताना राज्यभरात शाळा महाविद्यालय, मंदिरे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी कोरोनाचे नियम पाळून परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा प्रचंड जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो, यंदाच्या या मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

येत्या १५ तारखेला दसरा आहे, त्या अनुषंगाने ‘आपला दसरा, आपली परंपरा’ जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडेनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे.

भगवान भक्तीगडावरील १२ एकर परिसरात हा मेळावा होणार असून डागडुजी, परिसराची स्वच्छता आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते. तेही बाहेर काढण्यात आले असून तेथे कायमस्वरूपी पाणी साचणार नाही यासाठी वॉटरप्रुफ करण्यात येत आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘एक प्रभाग एक उमेदवार’ निवडणूक पद्धतीला रिपाई’चा विरोध

  मुंबई | एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकारने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लागू...

दिवाळीत पुणेकरांना मिळणार म्हाडाचं मोठं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

  पुणे | यंदा पुणेकरांना म्हाडाकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. येन दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष भेट मिळणार आहे. पुणे म्हाडाकडून दिवाळीत ३ हजाराहून...

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग, मलिक म्हणतात व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शारुख खान याचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबी अधिकारी समीर वानखडे याने काल आर्थरोड जाईलमध्ये जाऊन काऊन्सिलिंग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments