R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति 'सत्तेत असून १०० टक्के बंद होत नसेल, तर तुमची काय लायकी आहे...

‘सत्तेत असून १०० टक्के बंद होत नसेल, तर तुमची काय लायकी आहे हे लक्षात येतं

 

मुंबई | उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीने सोमवारी (११ ऑक्टोबर) रोजी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली होती. मात्र या बंदला महाराष्ट्रातील अनेक व्यापारी संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे हा बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगण्याची वेळ आली होती. तसे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.

आता यावरुनच माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. पवार आणि काँग्रेसच्यानादाला लागून शिवसेना फसली, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच तीन पक्षांनी एकत्र येऊन पुकारलेला बंद हा जेमतेम २५ टक्के ठिकाणीच दिसला, असं म्हणत ही महाविकास आघाडीसाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट असल्याचं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच पुढे सत्तेत असूनही तिन्ही पक्ष मिळून १०० टक्के बंद करू शकले नाहीत, यावरून तुमची लायकी काय आहे हे लक्षात येतं, असं म्हणत सत्ता नसती तर एक गल्लीही बंद करण्याची धमक तुमच्यात नाही, असा घणाघाती हल्ला राणेंनी ठाकरे सरकार व महाविकास आघाडीवर केला आहे. यावर आता महाविकास आघाडीकडून काय प्रत्युत्तर मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते, भुजबळांनी लगावला टोला

  नाशिक | नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला होता....

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments