R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा 'दलित पोस्टर बॉय' असा उल्लेख करून भाजपा नेत्यांने नव्या वादाला...

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा ‘दलित पोस्टर बॉय’ असा उल्लेख करून भाजपा नेत्यांने नव्या वादाला तोड फोडले

 

पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने जातीच्या मुद्दयावरून राजकारण सुरु केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना भाजप नेत्याने दलित पोस्टर बॉय म्हटले आहे. एका दलित युवकाची जमावाने राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात हत्या केली, भाजप नेत्याने त्या प्रकरणावरून चन्नी यांचे नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस पक्ष केवळ मतांचे राजकारण करत असून त्यांना लोकांचा विकास करायचा नसल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेससह समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यावरही भारतीय जनता पार्टी एससी मोर्चाचे अध्यक्ष लालसिंग आर्य यांनी शाब्दिक हल्ला केला आहे. राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात दलितांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पक्षाचे ‘दलित पोस्टर बॉय’ आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी राजस्थानला का गेले नाहीत? असा प्रश्न लालसिंग आर्य यांनी विचारला.

आर्य म्हणाले, एससी समाजातील महिलांवर बलात्कार होतो आणि राजस्थानमध्ये मुले सुरक्षित नाहीत. परंतु, काँग्रेससाठी चन्नीसारखे मुख्यमंत्री दलित पोस्टर बॉय असूनही तेथे जात नाहीत. या पीडित कुटुंबाला भेटायला काँग्रेसचे नेतृत्व देखील गेले नाही. तसेच उत्तर प्रदेशप्रमाणे येथेही त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना कोट्यवधी रुपये देण्याची मागणी केली नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments