R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अभिनेत्री स्वरा भास्कर शाहरुख खानच्या समर्थनात

अभिनेत्री स्वरा भास्कर शाहरुख खानच्या समर्थनात

 

मुंबई | अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या अटकेदरम्यान सुपरस्टार शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे. लेखक अखिल कात्याल यांच्या व्हायरल कवितेद्वारे त्यांनी हे समर्थन दर्शवले आहे. दोन्ही सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटर टाईमलाइनवर शाहरुख खानला टॅग करत किंग खानला समर्पित अखिल कात्यालची कविता शेअर केली आहे. या कवितेत शाहरुख खानने साकारलेल्या सर्व पात्रांचा उल्लेख आहे, ज्यामुळे तो बॉलिवूडचा किंग खान बनला आहे.

ही कविता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कवितेत एकीकडे शाहरुख खानने साकारलेल्या सर्व पात्रांची स्तुती केली आहे. तर, दुसरीकडे, ड्रग प्रकरणी आर्यन खानच्या अटकेवर शाहरुख खानवर निशाणा साधणाऱ्या त्या लोकांवरही जोरदार टीका केली होती. तसेच मीडियावर सुद्धा राग व्यक्त केला होता.

अभिनेत्री स्वरा भास्करने अखिल कात्यालची कविता शेअर केली आहे, ज्यात लिहिलेय की, ‘वह कभी राहुल है, कभी राज, कभी चार्ली तो कभी मैक्स, सुरिंदर भी वो, हैरी भी वो, देवदास भी और वीर भी, राम, मोहन, कबीर भी, वो. अमर है, समर है, रिज़वान, रईस जहांगीर भी.’ स्वरा भास्करने ही कविता तिच्या टाईमलाइनवर शाहरुख खानला हार्ट इमोजीसह टॅग करत शेअर केली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments