R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश समीर वानखडे यांच्या मुंबई पोलिसांविरोधात तक्रारीनंतर आशिष शेलार यांची ठाकरे सरकारवर टीका

समीर वानखडे यांच्या मुंबई पोलिसांविरोधात तक्रारीनंतर आशिष शेलार यांची ठाकरे सरकारवर टीका

 

मुंबई | एनसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफिने कारवाई करत या क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाला अटक करण्यात आली होती. एनसीबीने केलेल्या या कारवाईवर वेगवेगळ्या स्तरांवरून प्रतिक्रीया उमटत आहेत. यात आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत महाराष्ट्र पोलिसांवर निशाणा साधला आहे.

कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने ही कारवाई केली होती. या कारवाईत मुख्य भूमिका बजावणारे समीर वानखेडेंनी त्यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजसह मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

समीर वानखेडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर आशिष शेलारांनी पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस सुरू आहे का?, असा संतप्त सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे. तक्रारदारावरच पोलिसांनी गुन्हे दाखल करायचे, अनिल देशमुख प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यालाही पोलिसाकडून धमक्या दिल्याचा उल्लेख शेलारांनी केला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘एक प्रभाग एक उमेदवार’ निवडणूक पद्धतीला रिपाई’चा विरोध

  मुंबई | एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकारने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लागू...

दिवाळीत पुणेकरांना मिळणार म्हाडाचं मोठं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

  पुणे | यंदा पुणेकरांना म्हाडाकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. येन दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष भेट मिळणार आहे. पुणे म्हाडाकडून दिवाळीत ३ हजाराहून...

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग, मलिक म्हणतात व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शारुख खान याचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबी अधिकारी समीर वानखडे याने काल आर्थरोड जाईलमध्ये जाऊन काऊन्सिलिंग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments