R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मावळ गोळीबार झाला तेव्हा कुठे होते शरद पवार? प्रवीण दरेकरांचा सवाल

मावळ गोळीबार झाला तेव्हा कुठे होते शरद पवार? प्रवीण दरेकरांचा सवाल

 

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र बंद’ करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केली आहे. हा तर सरकार पुरस्कृत बंद सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रभर होता. बंद किती यशस्वी झाला. किती प्रकारे दबाव तंत्राचा वापर करुन कुठे रिक्षावाल्याला मारहाण, तर कुठे रिक्षाची चावी काढून घेणे तर चंद्रपूरला दमदाटी करणे अशा संपूर्ण घटना महाराष्ट्रत घडल्या आहेत. मावळ गोळीबार झाला, तेव्हा कुठे होते सरकार, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

मावळ गोळीबारात शहिद झालेल्या तीन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्रात गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झाले, त्यावेळेस कुठे होते सरकार? तेव्हा का नाही केलात बंद? हा केवळ चौकशांवरुन महाराष्ट्राचे लक्ष विचलित करण्याचा नियोजित कार्यक्रम आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्‍वभूमीवर केला आहे.

महाराष्ट्रावर निसर्ग, तोक्‍ते वादळाचे संकट आले. या वादळांमुळे पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकरी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला. काही दिवसांपूर्वी मराठवाडा, विदर्भामध्ये अतिवृष्टी होउन जो शेतकरी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले आहे. त्या शेतकऱ्यांना पुढील चार ते पाच वर्षे काहीच पिके घेता येणार नाहीत. आतापर्यंत एक दमडीची मदत सरकारने शेतकऱ्यांना केली नाही. आज त्या ठिकाणी पीक विमा असेल तो ही मिळाला नाही, अशी खंत दरेकर यांनी बोलून दाखविली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments