R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या स्वबळावर लढून भाजपा विजयाची परंपरा निर्माण करेल - चंद्रकांत पाटील

स्वबळावर लढून भाजपा विजयाची परंपरा निर्माण करेल – चंद्रकांत पाटील

 

भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवेल आणि विजयाची परंपरा निर्माण करेल. भाजपा आता राज्यात सर्वच निवडणुका एकट्याने लढवेल आणि कोणासोबत निवडणूक लढवून फसवणूक करून घेणार नाही, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर यांनी आपल्या समर्थक नेत्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपा मराठवाडा संघटनमंत्री संजय कोडगे, माजी आमदार मोहन फड, भाजपा परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम आणि शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, परभणी जिल्ह्यात भाजपाचे संघटनात्मक कार्य चांगले असले तरी निवडणुकात युतीमुळे शिवसेनेला संधी मिळाली आणि जिल्ह्यातील निवडणुकीच्या राजकारणात भाजपा कमकुवत राहिली. आता भाजपा परभणीमध्ये स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार असून पक्ष निवडणुकीच्या राजकारणातही प्रभावी ठरेल आणि विजयाची परंपरा निर्माण करेल. आता महाराष्ट्रात भाजपा एकट्याने निवडणुका लढवेल. एखाद्या पक्षासोबत निवडणूक लढवून फसवणूक करून घ्यायची नाही.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments