R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या Corona Death | मृतांच्या कुटुंबाला ५० हजारांची मदत, पंजाब सरकारची घोषणा

Corona Death | मृतांच्या कुटुंबाला ५० हजारांची मदत, पंजाब सरकारची घोषणा

 

पंजाब  | संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला होता. या संसर्गामुळे अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार पाठोपाठ पंजाब सरकारने सुद्धा कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. करोनामुळे आपले प्राण गमवावे लागणाऱ्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजारांची मदत देण्याची घोषणा पंजाब राज्य सरकारनं केली आहे.

करोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी केलीय. पंजाबमध्ये तब्बल १६ हजार ५३१ नागरिकांच्या करोनामुळे मृत्यूची नोंद झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार अद्याप कोविड मृतांची यादी तयार करण्यावर काम करत आहे.

या यादीच्या आधारावर लवकरच पीडित कुटुंबांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत पुरविली जाईल. यासंबंधी जिल्हा उपायुक्तांना एक पत्रही धाडण्यात आलंय. या पत्रात येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत मृतांची यादी राज्य सरकारपर्यंत पोहचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एक निश्चित प्रक्रिया पार पडल्यानंतर पीडित कुटुंबांपर्यंत हा मदतनिधी पोहचू शकेल

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

Recent Comments