R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश 'कोरोना बिलांचे ऑडिट गतीने करण्यासाठी कार्यवाही करा'

‘कोरोना बिलांचे ऑडिट गतीने करण्यासाठी कार्यवाही करा’

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खाजगी रुग्णालयांनी लूट लावून अव्वाच्या-सव्वा बिल लावून एक प्रकारे रुग्णाची लूटच केली होती. या बाबत संपूर्ण महाराष्ट्रातून राज्य सरकारकडे रुग्णालयाबाबत तक्रार येत होत्या. त्यातच आता या रुग्णालयाविरोधात राज्य सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना आकारलेल्या बिलांचे लेखापरीक्षण गतीने होण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

कोरोना एकल पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी यांनी विविध मुद्यांबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यानंतर टोपे यांनी या सूचना दिल्या. जन आरोग्य अभियानाचे डॉ.अभय शुक्ला यांनी बुधवारी सादरीकरण केले. त्यांनी कोविडमुळे पती गमावलेल्या महिला, खासगी रुग्णालयांमध्ये आकारलेले जादा बिल, खासगी रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षणसाठी लागत असलेला वेळ अशा विविध विषयांवर मांडणी केली.

आरोग्यमंत्री टोपे यांनी अभियानाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तपासणी केली जाईल. प्रलंबित राहिलेल्या बिलांची लेखा परीक्षण केले जाईल. त्यासाठी लेखापरीक्षकांची संख्या वाढवली जाईल, असे सांगितले. खासदार सुळे यांनी पुणे, नाशिक येथील लेखापरीक्षणाअभावी प्रलंबित असलेल्या कोविड रुग्णांच्या खासगी रुग्णालयातील बिलांबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना देण्याचे सांगितले. यावेळी जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘एक प्रभाग एक उमेदवार’ निवडणूक पद्धतीला रिपाई’चा विरोध

  मुंबई | एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकारने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लागू...

दिवाळीत पुणेकरांना मिळणार म्हाडाचं मोठं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

  पुणे | यंदा पुणेकरांना म्हाडाकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. येन दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष भेट मिळणार आहे. पुणे म्हाडाकडून दिवाळीत ३ हजाराहून...

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग, मलिक म्हणतात व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शारुख खान याचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबी अधिकारी समीर वानखडे याने काल आर्थरोड जाईलमध्ये जाऊन काऊन्सिलिंग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments