R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आपलं घराणं कुठलं, करताय काय?" शिवेंद्रराजेंचा उद्यनराजेंना जोरदार टोला

आपलं घराणं कुठलं, करताय काय?” शिवेंद्रराजेंचा उद्यनराजेंना जोरदार टोला

 

सातारा | आगामी सातारा नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, आता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरु केले आहे. यातच साताऱ्यात दोन राजघराण्यातील वाद उफाळून येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. आमदार शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर टीका करताना घराण्याची आठवण करून दिली आहे.

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने-सामने आले आहेत. उदयनराजे यांच्यावर टीका करताना शिवेंद्रराजे यांनी आपले घराणे कुठले आणि आपण करताय काय, असा थेट सवाल विचारत टोला लगावला आहे. यानंतर आता यावर उदयनराजे काय प्रतिक्रिया देतात, यावर चर्चांना उधाण आले आहे.

उद्यनराजे यांनी सातारा सर्किट हाऊसवर रामराजे यांची भेट घेतली होती. यावर शिवेंद्रराजे यांनी उद्यनराजेंवर टिका केली आहे. ते म्हणाले ‘ज्या रामराजेंना दाखवतो आणि बघतो ची भाषा केली. त्यांच्याशीच चर्चा करायला कशाला जायचं. आपलं घराणं कुठलं? करताय काय? छत्रपतीचं घराणं आहे. असा खोचक सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे. शिवेंद्रराजेंनी केलेल्या या टीकेमुळे हा वाद आता आणखी वाढणार असं दिसतंय.

याशिवाय उदयनराजेंनी केलेल्या पोस्टरबाजी आणि दुचाकी चालवण्याचाही शिवेंद्रराजेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. उद्यनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्ष सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकास कामांवर खर्च केला असता, तर बरं झालं असतं. नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजेंची ही नौटंकी सुरू असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments