R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति राष्ट्रवादीचं नाचता येईना अंगण वाकडे असं सध्या सुरु' चंद्रकांत पाटीलांनी लगावला टोला

राष्ट्रवादीचं नाचता येईना अंगण वाकडे असं सध्या सुरु’ चंद्रकांत पाटीलांनी लगावला टोला

 

मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादीला केंद्राकडून सत्ता स्थापन करण्याची ऑफर देण्यात आली होती अशी चर्चा सुरु असताना आता यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरात टोला लगावला आहे. केंद्राने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे. राष्ट्रवादीचं नाचता येईना अंगण वाकडे असं सध्या चालू आहे. तुम्ही आमच्याबरोबर सरकार बनवा अशी ऑफर केंद्राने पवार साहेबांना दिली होती तर ती ऑफर न स्वीकारण्या इतके पवार साहेब कच्च्या गुरूचे चेले नाहीत. केंद्रामध्ये सरकार असलेल्या पार्टीबरोबरच सत्ता स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला हे काय म्हणतात त्याचे काय अर्थ होतात हे कळतं, असा टोला पाटील यांनी लगावला.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, काही झालं तरी त्याचं खापर किंवा दोष केंद्राकडे देऊन मोकळे होतात. कोळसा कमी आहे, केंद्राने कोळसा दिला नाही, असं सांगितलं जात आहे. पण पावसामुळे कोळसा कमी मिळेल. कोळश्याचा स्टॉक करून ठेवा हे केंद्राने आधीच सांगितलं होतं हे ते सांगणार नाहीत. केंद्राच्या इशाऱ्यानंतरही कोळश्याचा साठा करण्यात कमी पडलो हेही ते सांगणार नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते, भुजबळांनी लगावला टोला

  नाशिक | नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला होता....

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments