R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पी एम केअर फंडाच्या संकेतस्थळावरून मोदींचा फोटो हटवा, ठाण्यातील काँग्रेस नेत्याने पाठवली...

पी एम केअर फंडाच्या संकेतस्थळावरून मोदींचा फोटो हटवा, ठाण्यातील काँग्रेस नेत्याने पाठवली नोटीस

 

ठाणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दानशूर व्यक्तींनी पीएम केअर फंडामध्ये सढळ हाताने मदत केली होती. मात्र दुसरीकडं पीएम केअर फंडच्या संकेतस्थळावर पंतप्रधान मोदी यांचा फोटो असल्याकारणामुळे काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यातच पी एम केअर फंडच्या संकेतस्थळावरून नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यासाठी सरकारला थेट नोटीस पाठवण्यात आली आहे.

ठाण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते विक्रांत चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पीएम केअर फंडच्या अधिकृत संकेतस्थळावरून पंतप्रधान मोदींचा फोटो, त्यांचं नाव, राष्ट्रध्वज आणि सोबतच देशाचे बोधचिन्ह हटवण्याची देखील मागणी केली आहे. विक्रांत चव्हाण यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

पीएम केअर फंड पूर्णपणे स्वतंत्र आहे. यात कोणतंही सरकारी काम केलं जात नाही. न्यासाचा निधी हा केंद्र सरकारच्या मालकीचा नाही. न्यासाकडे गोळा होणारा निधी हा देशाच्या एकत्रित निधीत जात नाही. त्यामुळे या स्थितीत न्यासाच्या नावात पंतप्रधान शब्दाचा वापर चुकीचा असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

न्यासाच्या नावात पंतप्रधान शब्दाचा वापर, अधिकृत संकेतस्थळावर पंतप्रधानांचे छायाचित्र प्रसिद्ध करणे, देशाचे बोधचिन्ह, राष्ट्रध्वज याचा वापरामुळे संविधानातील बोधचिन्ह आणि नावांचा अयोग्य वापर प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्यामुळे ते तातडीने हटवले पाहिजेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments