R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति " 'मोदीजींच्याच फोनवरुन गांधीजी आफ्रिकेतून सावरकरांशी बोलले असतील"

” ‘मोदीजींच्याच फोनवरुन गांधीजी आफ्रिकेतून सावरकरांशी बोलले असतील”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून दया याचिका वीर सावरकरांनी दाखल केली होती असे म्हटले आहे. यावरुनच आता काँग्रेसने मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि संघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. महात्मा गांधींबद्दल चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन करतानाच काँग्रेसने भाजप आणि मोदींना उपरोधिक टोलाही लगावला आहे.

राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सिंह यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत उपरोधक टोला लगावला होता. ‘असं वाटतंय की सर्व भाजपावाल्यांचं डोकं फिरलं आहे. महात्मा गांधींची विचारसणी सत्य आणि अहिंसेवर आधारित होती. सत्य म्हणजेच राम, सत्य म्हणजेच जीवन आणि सत्य म्हणजेच धर्म अशी त्यांची विचारसणी होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याऐवजी त्यांना शरण जाणंच योग्य आहे,’ असे म्हटले आहे.

पुढे लोंढे म्हणाले की, तुम्ही इतक्या हस्यास्पद गोष्टी करता की असं वाटायला लागतं की जेव्हा जगामध्ये डिजीटल कॅमेरा नव्हता तेव्हा मोदींनी डिजीटल कॅमेराने फोटो काढला होता, जगामध्ये ईमेल नव्हता तेव्हा त्यांनी ईमेल वापरला होता. त्याचप्रमाणे कदाचित मोदींजींच्याच फोनवरुन गांधीजी आफ्रिकेतून सावरकरांशी बोलले असतील, की तुम्ही माफी मागा,’ असा टोला लोंढे यांनी लगावला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments