R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांनी दिली 'हि' महत्वाची माहिती

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. ती आता पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरु करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, महाविद्यालये सुरु करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. त्यामध्ये अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50 टक्केपेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

कोरोनाची परिस्थिती पाहता प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्याची वेळ आली तर विद्यापीठाने त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. कारण काही अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहणे शक्य होणार नाही त्यांची नियमितपणे ऑनलाईन व्यवस्था महाविद्यालय किंवा विद्यापीठांनी करुन द्यायची असल्याचे सामंत यांनी सांगितले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘एक प्रभाग एक उमेदवार’ निवडणूक पद्धतीला रिपाई’चा विरोध

  मुंबई | एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकारने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लागू...

दिवाळीत पुणेकरांना मिळणार म्हाडाचं मोठं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

  पुणे | यंदा पुणेकरांना म्हाडाकडून मोठे गिफ्ट मिळणार आहे. येन दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष भेट मिळणार आहे. पुणे म्हाडाकडून दिवाळीत ३ हजाराहून...

एनसीबीकडून आर्यन खानचं काऊन्सिलिंग, मलिक म्हणतात व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता शारुख खान याचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबी अधिकारी समीर वानखडे याने काल आर्थरोड जाईलमध्ये जाऊन काऊन्सिलिंग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments