R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या माझ्यासोबत जे लोक आहेत. त्या लोकांनी मला कधीही असं वाटू दिलं नाही...

माझ्यासोबत जे लोक आहेत. त्या लोकांनी मला कधीही असं वाटू दिलं नाही की, मी मुख्यमंत्री नाही – देवेंद्र फडणवीस

 

मुंबई | मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. यावर सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांनी सुद्धा भाष्य केले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मला अजूनही राज्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे. या तुमच्या वक्तव्यावर टीका होत आहे, असं फडणवीस यांना विचारण्यात आलं, त्यावर त्यांनी उत्तर दिलं. टीका करणाऱ्यांनी जर माझं वक्तव्य पूर्ण ऐकलं असतं, तर त्यांनी माझ्यावर अशा प्रकारची टीका केलीच नसती, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

मी स्पष्टपणे सांगितलं आहे की, माझ्यासोबत जे लोक आहेत. त्या लोकांनी मला कधीही असं वाटू दिलं नाही की, मी मुख्यमंत्री नाही. त्या लोकांचा मला खंबीर पाठिंबा आहे. लोकांचा मला कसा प्रतिसाद आहे हे मी सांगितलेलं आहे. पण काही लोकांची बुद्धी थोडी कमी असते. ज्यांची बुद्धी कमी असते त्यांना माझं वक्तव्य समजलं नाही. त्यामुळं कमी लोकांच्या बुद्धीवर मी बोलणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments