R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेनेचा उद्या ऐतिहासिक दसरा मेळावा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार...

शिवसेनेचा उद्या ऐतिहासिक दसरा मेळावा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार |

 

शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाच दशकांपूर्वी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली अखंडपणे आजही सुरू आहे. कोरोना संकट अद्याप पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करीत यंदाचा दसरा मेळावा उत्साहात होणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी शिवतीर्थावर अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर येत असतात. मात्र मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोरोना संकटामुळे सर्वांच्या सुरक्षेसाठी थोडी मर्यादा आली आहे. यंदा सलग दुसऱया दिवशी बंद सभागृहात मेळावा होत आहे. मात्र शिवसैनिकांमध्ये तोच जोष, तोच उत्साह आजही कायम आहे. कोरोना नियमावलीच्या शिस्तीचे पालन करून ५० टक्के शिवसैनिकांच्या उपस्थितीत यंदाचा मेळावा होणार आहे.

षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ६ वाजता दसरा मेळाव्याला सुरुवात होईल. कोरोना नियमावलीचे त्यात काटेकोर पालन केले जाणार आहे. सभागृहात फक्त ५० टक्के उपस्थिती असणार आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते, उपनेते, खासदार, आमदार आणि संपर्कप्रमुख असे मोजके पदाधिकारीच सभागृहात असणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विशेषतः मुंबई आणि ठाणे येथीलच पदाधिकाऱयांना मेळाव्यासाठी बोलवण्यात आले आहे. इतर सर्वांना उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शनपर भाषण घरी राहूनही पाहता येणार आहे. वृत्तवाहिन्या आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून त्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments