R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं," पार्थ पवार यांची शायरीतून विरोधकांना...

“सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,” पार्थ पवार यांची शायरीतून विरोधकांना टोला

 

आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आप्तेंष्टांवर धाडी टाकल्या होत्या तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर सुद्धा आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. यानंतर पवार कुटुंबीयांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. तर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक हे सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. आता, अजित पवार यांचे सुपुत्र आणि युवक नेते पार्थ पवार यांनीही ट्विटरवरुन भाजपला इशारा दिला. त्यानंतर, शायरीतून आपले मतही व्यक्त केले आहे.

पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. ‘सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार, हीच का स्मार्ट सिटी? असा सवाल पार्थ पवार यांनी विचारला आहे. त्यानंतर, पार्थ यांनी शायरी ट्विट करुन पुन्हा एकदा मेसेज दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बहिण म्हणजे पार्थ यांच्या आत्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यामुळे, पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच घरात आलेले पाहुणे गेल्यानंतर मी सविस्तर सर्व पुराव्यासकट बोलेन असे सुद्धा अजित पवारांनी बोलून दाखविले होते.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments