R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आपण जे टगे पोसत आहोत ते कोणत्या कामाची बिलं काढतायत याचा अंदाज...

आपण जे टगे पोसत आहोत ते कोणत्या कामाची बिलं काढतायत याचा अंदाज घ्या – प्रीतम मुंडे

 

बीड | मुंडे भगिनी आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वाद साऱ्या राज्याला चांगलंच परिचित आहे. त्यातच मुंडे भगिनी भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये. त्यातच धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेचा आता खासदार प्रीतम मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनी विकासाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. आपण जे टगे पोसत आहात ते कोणत्या कामाची बिलं काढतायत याचा अंदाज घ्या असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी बीडच्या पालकमंत्र्यांवर निशाणा साधला.

तसेच पुढे त्या म्हणाल्या की, “दसरा मेळाव्याबाबत यावेळी उत्साह आहे. हा मेळावा कष्टकरी आणि भगवान बाबांच्या अनुयायंचा आहे. गेल्यावर्षी गुन्हे दाखल करण्यात आले. बीडमध्ये सध्या खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे. मेळाव्यानंतर जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले, जेसीबीनं फुलं उधळली गेली, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही,” असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

जिल्ह्यात फिरत असताना पालकमंत्र्यांनी रस्ते कोणी केले हे पाहिलं पाहिजे. आपण जे टगे पोसतोय ते कोणत्या कामाची बिलं काढतायत याचा अंदाज घ्या. जिल्ह्यात काय आणलं हे पाहायचं असेल तर परळी नगरपालिकेच्या बाहेर पडून पाहा, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, बीडमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्यावर पंकजा मुंडे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments