R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश मराठीच्या नावाने शिवसेनेला टार्गेट करणाऱ्या भाजपचे ८२ पैकी ४४ नगरसेवक अमराठी -...

मराठीच्या नावाने शिवसेनेला टार्गेट करणाऱ्या भाजपचे ८२ पैकी ४४ नगरसेवक अमराठी – यशवंत जाधव

पुन्हा एकदा मराठी शाळेच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष समोरासमोर आली आहे. मराठी माध्यमांच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या भाजपला सेनेने सडेतोड उत्तर दिले आहे. शिवसेना मराठी लोकांच्या हितासाठी स्थापनेपासूनच काम करीत आहे. मात्र असे असताना मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेनेला हिनवणाऱ्या भाजपचे मुंबई महापालिकेत ८२ पैकी ४४ नगरसेवक हे ‘अमराठी’ आहेत, अशी माहिती देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, सेनेच्या शिवधनुष्याच्या माध्यमातून ‘ जहरी’ बाण सोडून जखमी केले आहे.

शिवसेना ही मराठी माणसाची व मराठी भाषेची गळचेपी करीत आहे, असा घणाघाती आरोप भाजपतर्फे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. शिवसेनेने कोकण कन्या शुभांगी सावंत यांची सेवाज्येष्ठता डावलून पालिका चिटणीसपदी संगीता शर्मा यांची नेमणूक नियमबाह्य नेमणूक केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता तसेच याच मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला घेरले होते.

तसेच, मुंबईतील पालिकेच्या मराठी शाळा एकामागोमाग एक बंद पडत असून मराठी विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.शिवसेनेमुळे मराठीची गळचेपी होत असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे. आज स्थायी समितीच्या बैठकीतही मराठी – अमराठी मुद्द्यावरून शिवसेना व भाजप यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, त्याची गंभीर दखल घेऊन भाजपला वरीलप्रमाणे सणसणीत उत्तर दिले आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments