R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति "आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही"

“आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही”

 

कोल्हापूर | खासदार संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्यभर दौरे करणार आहेत. संभाजीराजेंच्या या निर्णयाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आहे. आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही हे संभाजीराजेंनी लक्षात घ्यावं, असं सांगतानाच संभाजीराजेंनी या चळवळीचं नेतृत्व करावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. संभाजी छत्रपती यांनी घेतलेल्याल निर्णयाचं स्वागत करेन. अभिनंदन करण्याइतका मी मोठा नाही. संभाजीराजेंकडून फार मोठी अपेक्षा आहे. या चळवळीला कुणी तरी नेतृत्व देण्याची गरज आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं तेव्हा सर्व संघटना रणांगणात उतरल्या होत्या. भाजपही उतरली होती.

ते म्हणाले की, मराठा आंदोलनात भाजप उतरली. पण भाजप राजकीय पक्ष असल्याने त्याला राजकीय रंग दिला गेला. मात्र, संभाजी राजे हे पक्षांच्यावर आहेत. त्यांनी नेतृत्व केलं तर या चळवळीला बळ येईल. हे सरकार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. संभाजी राजेंनी हे लक्षात घ्यावं. सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. ते त्यांनी करावं, असं पाटील म्हणाले.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments