R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा, काय बोलणार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेनेचा आज दसरा मेळावा, काय बोलणार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

 

मुंबई | पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सायंकाळी ६:०० वाजता संबोधित करणार आहे. त्यामुळे आज ते काय बोलतात, याबाबत उत्सुकता आहे. सुमारे १२०० जणांच्या उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा होणार आहे. तसेच विरोधकांचा कशा प्रकारे समाचार घेणार हे सुद्धा पाहावे लागणार आहे.

काही महिन्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेली कारवाई, लखीमपूरमधील घटना, महाराष्ट्र बंद, भाजपच्या राज्यातील नेत्यांनी गेल्या काही दिवसात ठाकरे आणि सरकारवर केलेले आरोप यांचा समाचार ते भाषणात घेतील, अशी शक्यता आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल उद्धव ठाकरे फुंकतील, अशीही शक्यता आहे. गेली ३० वर्षे या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे आणि टिकवायचीच या निर्धाराने ते शिवसैनिकांना काय संदेश देतात, हे पाहणेही महत्त्वाचे असेल.

‘महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारा दसरा मेळावा’अशी या मेळाव्याची टॅगलाईन आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्यावर ठाकरी शैलीत उद्धव ठाकरे फटकारे असतील, असे मानले जाते. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याविषयी शिवसेना नेते रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप, अनिल परब, खा. भावना गवळी यांच्यावर ईडीने केलेली कारवाई, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेले वक्तव्य याबाबत ठाकरे काय बोलतात, याविषयीदेखील उत्सुकता असेल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments