R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति भाजपने विश्वासघात केला या म्हणण्यावर आजही ठाम, महादेवराव जाणकार यांची टीका

भाजपने विश्वासघात केला या म्हणण्यावर आजही ठाम, महादेवराव जाणकार यांची टीका

 

नगर | पुन्हा एकदा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेवराव जाणकार यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वासघाती असल्याचा आरोप करून जोरदार टीका केली आहे. ‘भाजपने आमचा विश्वासघातच केला आहे’, या म्हणण्यावर मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार आहे, असे प्रतिपादन महादेव जानकर यांनी केले.

नगरमध्ये रासपच्या कार्यालयाची स्थापना झाली. त्यानंतर जानकर पत्रकारांशी बोलत होते. जानकर म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष जिंतुर आणि दौंडची जागा आम्हाला देणार होते. मात्र, त्यांनी ती जागा आम्हाला दिली नाही. याचा जाब भाजपच्या नेत्यांना विचारला पाहिजे. मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे’, या मतावर मी आजही ठाम आहे आणि उद्याही राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

रासप स्वतंत्र पक्ष आहे. केंद्र व राज्याच्या निवडणुकीत, सत्तेत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. मात्र, स्थानिक निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे, असे जानकर म्हणाले. सध्या राज्यात ईडी व इतर चौकशांचा ससेमिरा सुरू आहे, याबाबत ते म्हणाले, ‘एखाद्यावर विनाकारण आरोप करून त्याला आरोपीच्या पिंजऱयात उभे करणे योग्य नाही. विनाकारण त्रास देण्याची प्रवृत्ती योग्य नाही. केंद्र सरकारने याचे आत्मचिंतन केले पाहिजे’, असा टोलाही जानकर यांनी लगावला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments